मध्यरात्री दरवाजाला कडी न लावल्याने चोरट्यांनी साधली संधी : साकेगावातून 60 हजारांच्या लॅपटॉपसह पाच मोबाईल लांबवले
Thieves seized the opportunity as the door was not locked in the middle of the night : Five mobile phones along with a laptop worth 60 thousand were stolen from Sakegaon भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे भाडे तत्वावर राहत असलेल्या भाडेकरू तरुणांच्याा घरातून चोरट्यांनी मध्यरात्री पाच मोबाईलसह लॅपटॉप लांबवला. हा प्रकार बुधवार, 12 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरवाजाला कडी नसल्याची चोरट्यांनी साधली संधी
नरसिंग काकडीया वसावे (25, गमळ पिंपळखुंटा, अक्कलकुवा, ह.मु.साकेगाव) हे प्रमोद सोनवणे यांच्या मालकिच्या घरात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत शिवाय त्यांच्यासोबत अन्य तरुण शिक्षणानिमित्त भाडे तत्वाने राहतात. बुधवारी रात्री वसावे यांना झोप लागल्यानंतर त्यांना दरवाजाची कडी लावण्याचा विसर पडल्याने चोरट्याने घरात प्रवेश करीत 42 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल, 18 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप लांबवला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर वसावे यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार नोंदवली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.
