दहिगावात महापुरूषांच्या फलकाची विटबंना : पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन


Placard of legends vandalized in Dahigaon : Police administration appeals for peace यावल : तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर महापुरुषांच्या प्रतिमेची अज्ञात समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावातील तणावाचे वातावसरण निर्माण झाले. याबाबतची माहिती कळताच मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, यावल निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनासह सरपंच अजय अडकमोल यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान गावात गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिकारी तळ ठोकून आहेत.

अज्ञात समाज कटकांकडून फलकाचे विटंबना
यावल तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषांच्या प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमला. यावेळी सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले. याप्रसंगी सरपंच अजय अडकमोल, विलास अडकमोल यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावात तणावपूर्ण शांतता
गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी फौजदार अविनाश दहिफळे, सुनील मोरे, सुनीता कोळपकर यांच्यासह पोलीस ताफा तैनात आहे. दरम्यान पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सोनवणे यांनी दिली. तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल-दहिगाव-सावखेडा बस सेवा सकाळपासून बंद होती. दरम्यान, निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, विष्णू पारधे, यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !