गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजपाच्या पदाधिकार्‍यावर गोळीबार : नाशिकमध्ये खळबळ


Firing on BJP office bearer with criminal background : Nashik stirs नाशिक : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला भाजपाचा पदाधिकारी राकेश तुकाराम कोष्टी यांच्यावर सिडकोमधील बाजीप्रभू चौक भागात दुचाकीवर आलेल्या तिघांनी पाठीमागून गोळीबार केल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली. भडकलेल्या गँगवॉरमधून ही घटना रविवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. गोळीबार करणार्‍या संशयीतांपैकी एका संशयीतास पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

पाळत ठेवून केला गोळीबार
राकेश कोष्टी हा सकाळी बाजीप्रभू चौकातील मंदिरात त्याच्या बुलेट दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या तिघांनी गोळीबार केला. गोळीबारात जखमी झालेल्या कोष्टीला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. . गोळीबार झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी गोळीबाराचा कट रचण्याच्या संशयात पंचवटी येथील जयेश दिवे याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर अन्य दोघांच्या मागावर पोलीस आहेत. राकेश कोष्टी याच्यावर गोळीबार करणारे पूर्वी एकमेकांचे मित्र होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने वर्चस्वाच्या लढाईतून एकमेकांनाना शह देण्याची स्पर्धा सुरू झाल्याने त्यांच्यात गँगवॉर भडकल्याची चर्चा आहे.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
गोळीबाराची माहिती कळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली, श्रीकांत निंबाळकर यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !