अल्पवयीन प्रेमी युगुलांनी गळफास घेत संपवले जीवन


बुलढाणा : एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अल्पवयीन युगूलांनी गळफास घेतला. ही घटना रविवारी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या आदिवासी गाव असलेल्या कहू पट्टा येथे घडली. थानसिंग मोरे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला आकाश पन्नालाल डाबर व प्रियंका भाईलाल मसाने यांनी गळफास घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

जळगाव जामोद पोलिसांची धाव
कहू पट्टा येथील आदिवासी नागरिकांच्या लक्षात ही बाब येतात त्यांची तारांबळ उडाली त्यांनी याबाबत सुनगावचे पोलीस पाटील तडवी यांना माहिती दिली, पोलीस पाटील तडवी यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली व पोलीस स्टेशन जळगाव जामोद याबाबत माहिती देण्यात आली. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद वीर, बीड जमादार शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर प्रेमी युगलाचे मृतदेह खाली उतरून त्याचा पंचनामा केला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
या घटनेची तक्रार मृतक मुलाचे काका सखाराम डावर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !