थोरगव्हाणला वाद : सात जणांविरोधात गुन्हा
रावेर : शेतात जाण्यासाठी बोलावण्यास आल्यानंतर झालेल्या वादातून दोघांना मारहाण करण्यात आली तसेच एकाच्या हाताला चावा घेण्यात आला. ही घटना रावेर तालुक्यातील थोरगव्हाण गावाजवळील जोगेश्वरी मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सात संशयीतांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपक दत्तात्रय चौधरी (28, थोरगव्हाण) यांच्या फिर्यादीवरून संशयित धीरज प्रवीण पाटील, प्रवीण केशव पाटील, साधना प्रवीण पाटील, खुशबू धीरज पाटील, राजेश भास्कर पाटील, छाया रामकृष्ण पाटील, पल्लवी राजेश पाटील (सर्व रा.थोरगव्हाण, ता.रावेर) यांच्याविरोधात दंगल व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पांडुरंग सपकाळे करीत आहेत.
