दावत-ए-इस्लामी हिंदतर्फे भुसावळ कारागृहात ईद मिलन
भुसावळ : सालाबादाप्रमाणे दावत-ए-इस्लामी-हिंदच्या तुरुंग सुधारणा विभागांतर्गत शहरातील उपकारागृहात ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चारीत्र्याने चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न करा
या कार्यक्रमात दावत-ए-इस्लामीचे वक्ते मुहम्मद शोएब अत्तारी यांनी कैद्यांना नैतीक सल्ला देताना सांगितले की, कुस्तीमध्ये जो विजयी होतो तो बलवान नसून रागाच्या वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा बलवान असतो. कारण रागाच्या भरात माणूस असे काही करतो ज्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवून नैतिकतेने व चारीत्र्याने चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर कारागृह अधीक्षक मानकर यांनीदेखील कैद्यांनाएक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले,. माजी नगरसेवक साबीर शेख यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी दावत-ए-इस्लामी हिंदच्या प्रचार विभागाचे सदस्य रफिक रोशन कादरी उपस्थित होते.

