द केरला स्टोरी सिनेमा कर मुक्त करा : शिशिर जावळे
भुसावळ : द केरला स्टोरी सिनेमा कर मुक्त करावा, अशी मागणी भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे. केरळ राज्यातून बेपत्ता झालेल्या तरुणी आणि महिलांचा नेमक काय झालं? त्या मागचे सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणण्यात आले आहे. हा चित्रपट दहशतवादी संघटनांनी महिलांच्या केलेल्या तस्करीच्या संदर्भात सत्यता सांगतो. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पद्धतीने झाला जो अंगावर शहारे आणणारा आहे.
महाराष्ट्रात चित्रपट करमुक्त करावा
आपल्या देशात एखाद्या राज्यात महिला आणि तरुण मुली महिलांना कशा पद्धतीने जबरदस्तीने षडयंत्र करून त्यांना आतंकवादी बनवून आपल्या देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याच कारस्थान सुरू आहे व हे कारस्थान हे सत्य भारतीयांना तरुण महिला मुलींना माहिती व्हावं आणि सर्व भारतीय तरुण महिला मुली सदैव सतर्क असाव्यात यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात सुद्धा दाखवण्यात येऊन तो महाराष्ट्र शासनाने करमुक्त करावा, अशी मागणी श्री नमो विचार मंच तथा साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.

