शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या सहा दुचाकींसह चोरटे जाळ्यात


Big achievement of Shirpur city police : Thieves caught with six stolen bikes शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या बांधल्या असून त्यांच्याकडील सहा चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. संतोष विठ्ठल हटकर (33, क्रांतीनगर शिरपूर) व रीतेश सुरेशसिंग जमादार (37, रा.सातपूर, नाशिक, हल्ली क्रांतीनगर, शिरपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. अनेक गुन्हे आरोपींच्या अटकेने उघडकीस येणार आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
हेमंत अनिल भोई (रा. आदर्शनगर, शिरपूर) यांनी शहरातील खंडेराव मंदिरासमोर दुचाकी गाडी लावली असताना अज्ञात चोरट्याने लांबवल्यानंतर शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक तपास करीत असताना संशयित शहरात फिरत असताना पथकाला संशय आल्याने त्यांच्याकडील दुचाकीची कागदपत्रे विचारल्यानंतर आरोपींचे बिंग फुटले. आरोपींच्या ताब्यातून दोन लाख 80 हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपींनी शिरपूरसह शिंदखेडा येथून दुचाकी चोरीची कबुली दिली आहे तर चेसीस क्रमांकाद्वारे आरोपींनी दुचाकी कुठून चोरी केल्याचा याचा शोध घेतला जाणार आहे.

यांन केली कामगिरी
ही कामगिरी धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, डी.बी. पथकातील ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, प्रवीण गोसावी, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार व राम भिल यांच्या पथकाने केली.

.

 


कॉपी करू नका.