धुळे शहरातील तरुणाची गोळ्या झाडून तसेच चाकूचे वार करीत हत्या


A young man from Dhule town who had gone to look for farm laborers was shot dead and stabbed to death धुळे : शहरातील तरुण शेतकर्‍याची गोळ्या झाडून व चाकूचे वार करीत हत्या करण्यात आली. ही घटना धुळे तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत यशवंत सुरेश बागुल (38, रा.मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत यशवंतची पत्नी आशाबाई यशवंत बागुल यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हत्येचे कारण अस्पष्ट
धुळे शहरातील साक्री रोडवरील मिलिंद सोसायटीतील यशवंत सुरेश बागुल यांनी धुळे तालुक्यातील उभंड नांद्रे येथे शेती घेतल्याने आठवड्यातून काही दिवस ते शेती सांभाळत होते. गुरुवारी सायंकाळी ते शेतमजूर शोधण्यासाठी ते मामेभाऊ पंकज राजेंद्र मोहिते सोबत पिंपरखेडा येथे गेे मात्र परतीच्या पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवत आधी बोलण्याचा प्रयत्न करीत नंतर गोळी झाडून तसेच चाकूचे वार करीत हल्ला केला.

गोळ्यांचे कार्टेज जप्त
एक गोळी बागुल यांच्या कानाजवळून गेली तर दुसर्‍या संशयिताने चाकू सारख्या धारदार हत्याराने मानेजवळ, पोटात वार केल्याने यशवंत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी गावठी कट्ट्याच्या गोळ्यांच्या रीकाम्या पुंगळ्या आणि मॅग्झिन आढळल्े. धुळे तालुका पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे व सहकार्‍यांनी माहिती जाणली. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


कॉपी करू नका.