आधी दिले लग्नाचे वचन, नंतर केला अत्याचार, अडीच लाख रुपयेही लाटले : नेरच्या तरुणाविरोधात गुन्हा


First promise of marriage, then torture, two and a half lakh rupees were stolen : crime against youth of Ner धुळे : राज्यातील महिलांसह मुलींवर अत्याचाराच्या घटना थांबायला तयार नाही. धुळे तालुक्यातील एका गावातील 31 वर्षीय महिलेवर लग्न करण्याच्या आमिषाने तरुणाने अत्याचार केला मात्र लग्न न करता फसवणूक केली शिवाय संशयिताने महिलेकडून गोड बोलून अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप महिलेने केल्याने या प्रकरणी संशयित तुषार विठ्ठल बडेर (33, नेर) विरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल दाखल झाला.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
नेर येथील 31 वर्षीय पीडित महिलेने धुळे तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तुषार विठ्ठल बडेर (33, रा.नेर) याने पीडीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गाव शिवारातील एकाच्या शेतातील शेडमध्ये अत्याचार केला तसेच महिलेची अडीच लाखात फसवणूक केली.

पीडीतेने पैसे परत मागितले असता संशयित तुषार याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार सुमारे आठ महिन्यापूर्वी घडला. याप्रकरणी संशयीत आरोपीविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक ताटीकोंडलवार अधिक तपास करीत आहेत.

 


कॉपी करू नका.