इंदौरकडून महाराष्ट्रात येणारी प्रतिबंधीत 20 लाखांची तंबाखू शिरपूरात तप्त : युपीतील चालकाला बेड्या

शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी : युपीतील चालकास अटक


Banned tobacco worth 20 lakh seized in Shirpur शिरपूर : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या तंबाखूची वाहनाद्वारे मध्यरात्री वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूरचे प्रभारी उपअधीक्षक तथा पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला सूचना दिल्यानंतर शहादा फाटा, कळमसरा शिवारात शनिवारी पहाटे तीन वाजता सापळा रचण्यात आला. संशयित आयशर वाहन आल्यानंतर त्यातून सुमारे 20 लाखांची प्रतिबंधीत तंबाखू जप्त करण्यात आली तर युपीतील चालकाला अटक करण्यात आली. जमाल अली अहमद (48, रा.नारायचा जाफरगंज, ता.बिडकी, जि.फतेहपूर हासवा, राज्य, उत्तर प्रदेश) असे अटकेतील चालकाचे नाव आहे.

मध्यरात्रीच्या कारवाईने खळबळ
शिरपूर शहरचे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर इंदौरकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणारी आयशर (यू.पी. 53 ई.टी.0241) ही शनिवारी पहाटे तीन वाजता आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यात प्लॅस्टीक फिल्म मालाचे आडोशास 19 लाख 74 हजार रुपये किंमतीची भोला छाप सुगंधीत तंबाखू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. तंबाखूसह वाहन असा एकूण 39 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आयशर चालक जमाल अली अहमद (48, रा.नारायचा जाफरगंज, ता.बिडकी, जि.फतेहपूर हासवा, राज्य उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर निरीक्षक ए.एस.आगरकर, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, डी.बी.पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, भटू साळुंके, प्रवीण गोसावी, होमगार्ड मिथून पवार, राम भील, चेतन भावसार व शरद पारधी आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.