यावल तालुक्यातील विवाहितेला लग्नाच्या आमिषाने पळवले ; मुंबईसह जळगावात अत्याचारातून पीडीता गर्भवती
A married woman in Yaval taluka was lured away by the lure of marriage ; Atrocities in Mumbai and Jalgaon यावल : यावल तालुक्यातील एका मोठ्या गावातील 26 वर्षीय विवाहित तरुणीला पळवून नेत मुंबईसह जळगावातील लॉजवर अत्याचार करण्यात आल्याने पीडीता त्यातून गर्भवली राहिली मात्र आरोपीने गर्भपात करण्यास भाग पाडून नंतर लग्न न करता तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सर्फराज सईदखान (24, रा.यावल तालुका) याच्याविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
विवाहित तरुणीला पळवून नेत केला अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावात 26 वर्षीय विवाहिता पीडीता वास्तव्यास असून तिचे लग्न झाले असतानाही संशयिताने तिच्याशी जवळीक साधली व तिच्याशी लग्न करेल, असे आमिष दाखवून सहा महिने आधी ते 26 जून 2023 पर्यंत तिच्यावर मुंब्रा, जळगाव व फैजपूर येथील लॉजवर अत्याचार करण्यात आला. अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले व बदनामी करण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडीतेने फैजपूर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर संशयित सर्फराज सईदखान (24, रा.यावल तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.
