शिंदे गटाच्या विरोधानंतर अजितदादांना ‘अर्थ’ खाते ; जाणून घ्या वजनदार खात्याचे मंत्री
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते देण्यावरून शिंदे गटातील आमदारांची नाराजीची भूमिका असताना व त्यामुळेच बाहेर पडल्याची भूमिका आमदारांनी मांडल्यानंतरही शुक्रवारी अजित पवारांसह त्यांच्या मंत्र्यांना दमदार खाती मिळाल्याचे दिसून आले. 2 जुलै रोजी शिंदे-फडणवीसांच्या मंत्री मंडळात अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर आणखीही 8 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला मात्र शपथविधीनंतरही खाते वाटप झाले नसल्याने चिंता वाढली होती मात्र शुक्रवारी ही चिंता मिटली असून खातेवाटप करण्यात आल्यानंतर दादांच्या मंत्र्यांना दमदार खाते मिळाल्याचे दिसून आले आहे.
वजनदार खाते अजित दादांच्या गटाकडे
अजित पवार यांना अर्थ आणि नियोजन, दिलीप वळसे-पाटील यांना सहकार, मराठवाड्याच्या अब्दुल सत्तार याच्याकडे असलेलं कृषी खातं काढून घेऊन ते फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्याकडे तर आदिती तटकरे यांना महिला आणि बालकल्याण खाते देण्यात आले.

मंत्रीनिहाय खाते वाटप असे
अर्थ व नियोजन- अजित पवार
सहकार- दिलीप वळसे पाटील
कृषी- धनंजय मुंडे
अन्न व नागरी- छगन भुजबळ
महिला व बालविकास- आदिती तटकरे
क्रीडा- संजय बनसोडे
मदत व पुनर्वसन- अनिल पाटील
अन्न व औषध प्रशासन- धर्मरावबाबा अत्राम
वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ
