अजितदादा स्पष्टच म्हणाले ; होय, सिल्व्हर ओकवर शरद पवार साहेबांसोबतही झाली भेट
Ajitdada clearly said ; Yes, there was also a meeting with Sharad Pawar Sahab at Silver Oak नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओकवर गेल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाशिकमध्ये आल्यानंतर माध्यमांनी याबाबत छेडले असता ते म्हणाले की, होय, मी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटलो. तिथे सुप्रिया सुळेही होती. तुम्हाला काही अडचण आहे का?,
भेटीबाबत स्पष्टपणे केला उलगडा
शरद पवार यांच्या पत्नी व अजितदादा पवारांच्या काकी प्रतिभा पवार यांच्या हातावर 14 जुलै रोजी शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठीच अजित पवार शुक्रवारी सिल्व्ह ओकवर गेले होते मात्र, या भेटीबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नव्हती. अखेर शनिवारी नाशिकमध्ये पत्रकार परीषदेत अजित पवार यांनी या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राजकारण काहीही असले तरी आमचे कौटुंबिक नाते आहे. प्रतिभा काकूंना शस्त्रक्रियेनंतर घरी आणल्यानंतर मी सुप्रियाला फोन केला होता. तेव्हा आम्ही घरीच जात आहोत, असे तिने सांगितले व घरी बोलावले. त्यामुळे मी रात्री सिल्व्हर ओकवर त्यांना भेटायला गेलो.

होय शरद पवारांनाही भेटलो
सिल्व्हर ओक हे शरद पवारांचेच घर असल्याने तेदेखील तिथेच होते व त्यांचीही भेट झाली. सुप्रियाही तिथेच होती. तिचीही विचारपूस झाल. तसेच केवळ कौटुंबिक चर्चा झाली, असे सांगत अजितदादांनी अधिक काही सांगणे टाळले.
