ऐनवेळी उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने मलाही बसला धक्का : देवेंद्र फडणवीस !
I was also shocked by being made Deputy Chief Minister at the right time: Devendra Fadnavis! नागपूर : हिंदू आणि हिंदुत्वाचा दम घुटत असल्याने मी एकनाथ शिंदे एवढे मोठे पाऊल उचलतायत तर त्यांनीच मुख्यमंत्री व्हायला हवे, असे मत मांडले. दिल्लीत गेलो, वरीष्ठांना समजावून सांगितले मात्र पक्षाने लगेचच माझा प्रस्ताव स्वीकारला नाही. मी ठरविले होते की मी मुख्यमंत्री होणार नाही व प्रदेशाध्यक्ष होवून मिळेल ती जवाबदारी पार पडणार होतो मात्र अचानक दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यावर होकार व ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री केल्याने मलाही धक्का बसला, अशी प्रांजळ कबुली ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यांनी देत काही खुलासे केले आहेत.
अखेर पक्ष नेतृत्वाने प्रस्तावाला दिली मान्यता
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एवढे मोठे पाऊल उचलणार आहेत, त्यांनाच नेता बनवावे यावर पक्षाचे नेते सहमत होते परंतु ते लोकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतील का? या सवालावर सारे अडले होते. परंतु काही दिवसांनी दिल्लीतील नेत्यांनी शिंदेना मुख्यमंत्री करण्यावर सहमती दर्शवली, असे फडणवीस म्हणाले.

तेव्हा मलाही बसला धक्का
मला प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तसे वरीष्ठांशी बोलणे झाले. मी सरकारमध्ये राहणार नाही, असे त्यांना सांगितले होते. प्रदेशाध्यक्ष बनून मी ती जबाबदारी पार पाडेन, असे सांगितले होते व कठोर मेहनत घेऊन पुढील दोन वर्षांत पक्षाला एक नंबरला नेईन, सर्वकाही असे ठरले. पण ऐनवेळी मला उपमुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा मला धक्का बसला असे फडणवीस म्हणाले.
