ठेकेदारांच्या बिलांसाठी आंदोलन करणार्या जळगावातील नगरसेवकांना अपात्र करा : दीपककुमार गुप्ता यांचे निवेदन
Disqualify Jalgaon corporators agitating for contractors’ bills: Statement by Deepak Kumar Gupta जळगाव : ठेकेदारांच्या बिलांसाठी आंदोलन करणार्या नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड – भोसले यांच्या मार्फत आयुक्तांना निवेदन दिले आहे.
तर चौकशी करून संबंधितांना अपात्र करा
निवेदनात नमुद करण्यात आले की, 27 ते 29 जुलै दरम्यान जळगाव मनपाच्या इमारतीसमोर नगरसेवकांकडून शहरातील साफसफाईसह मुलभूत सुविधासाठी साखळी उपोषण करण्यात आले परंतु हे उपोषण मक्तेदारांची बिले काढण्यासाठी होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे जर हे आंदोलन मक्तेदारांची बिले काढण्यासाठी असेल तर, त्याची चौकशी करून अशा नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड यांच्या मार्फत आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे.

