कोविड घोटाळा : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा
Kovid Scam: Case against Mumbai Mayor Kishori Pednekar मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोविड घोटळ्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविड घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिल्यानंतर शुक्रवारी पेडणकर यांच्याविरोधात तसेच महापालिकेच्या दोन अधिकार्यांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
विरोध डावलून दिले कंत्राट
महापौरपदी पेडणकर असतांना दोन हजार रुपये किंमतीची बॉडी बॅग 6 हजार 800 रुपयांना विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. हे कंत्राट देताना महापालिकेतील काही अधिकार्यांनी विरोध केला होता. त्यांचा हा विरोध डावलून हे कंत्राट देण्यात आल्याचाही आरोप आहे. त्याचबरोबर औषधांची खरेदी वाढीव दराने करण्यात आल्याचाही आरोप आहे.

या अगोदर सुजीत पाटकर यांना अटक करण्यात आली होती. आता किशोरी पेडणेकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व रहावे यासाठी गेल्या काही महिन्यात सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर घोटाळ्याचे आरोप करत आहे.
ईडीने 21 जून रोजी विविध ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यात 68 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम आणि जवळपास 150 कोटी रुपये किंमतीची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय 15 कोटींच्या एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. 21 जूनला ईडीने केलेल्या छापेमारीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्यासह 10 ते 15 जणांचा समावेश होता.
