शिंदे गटाच्या आमदार पूत्राने केले मुंबईतील व्यावसायीकाचे अपहरण
मुंबई : मुंबईतील व्यावसायिकाचे शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. व्यावसायिकाला मारहाण करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या प्रकाराने शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे अडचणीत सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे अपहरण करून प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने व त्याच्या साथीदाराने आपल्याला आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर येथील कार्यालयात आणल्याचा आरोपही व्यावसायिकाने केला आहे.
यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
मुंबईतील वनराई पोलिसांत या प्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यासह मनोज मिश्रा, पद्माकर, विकी शेट्टी आणि इतर 10 ते 12 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. व्यावसायिक राजकुमार सिंह यांनी ही तक्रार केली आहे. या प्रकारामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.

