उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची पुण्यात बैठक !


Deputy Chief Minister Ajit Pawar and NCP President Sharad Pawar meeting in Pune! पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे शहरात गुप्त बैठक झाल्याची चर्चा असून या बैठकीचा तपपशील अद्याप समोर आलेला नाही. पुण्यातील व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात ही बैठक झाली. शरद पवार आज पुण्यात होते तसेच चांदणी चौकातील पूलाच्या उद्घाटनासाठी अजित पवारही पुण्यात होते. या कार्यक्रमानंतर कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याचे बोलले जात आहे.

एकामागून एक नेते पडले बाहेर
अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाली. सुरुवातीला शरद पवार हे घराबाहेर पडले. त्यानंतर काही वेळाने अजित पवारांचा ताफा बंगल्यातून बाहेर पडला. मागील काही दिवसांपासून शरद पवार-अजित पवार दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात पवार काका-पुतणे यांच्यात ही भेट झाली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !