बामणोदला शेतात काम करतांना 20 वर्षीय तरुणास सर्पदंश
A 20-year-old youth was bitten by a snake while working in the fields at Bamanod
यावल : यावल तालुक्यातील बामणोद येथे एका 20 वर्षीय तरुणाला शेतात काम करताना सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
शेतात काम करताना सर्पदंश
बामणोद, ता.यावल येथे शेत शिवारात धनराज तुळशीराम सोनवणे (20)हा तरुण शेतात काम करीत असताना त्याच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हाप्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने तेथून उपचाराकरीता रुग्णवाहिकेद्वारे यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपरीचारिका मंजुषा कोळेकर, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी उपचार केल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.








