भुसावळातील चमेली नगरातील प्रौढाची रेल्वेखाली आत्महत्या


An adult committed suicide under a train in Chameli Nagar in Bhusawal भुसावळ : शहरातील वांजोळा रोडवरील चमेली नगरातील रहिवासी भागवत सोपान नारखेडे (43) यांनी स्वामी समर्थ केद्राजवळील रेल्वे लाईनीवर आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. नारखेडे यांच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
चमेली नगरातील रहिवासी भागवत नारखेडे हे एका दुकानावर कामास होते. सोमवारी रात्री 10. 30 वाजता त्यांचा मृतदेह हा रेल्वे लाईनीवर पडलेला दिसल्याने उपस्टेशन मास्तर यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. यामुळे पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, मोहन पाटील यांनी घटनास्थळी जात पाहणी करीत पंचनामा केला. मृत व्यक्तीच्या खिश्यात आधारकार्ड मिळाल्याने उपनिरीक्षक पाथरवट यांनी त्यावरील नाव पाहून चमेली नगरात संपर्क करीत भागवत नारखेडे यांची खात्री केली. रात्रीच मृतदेह हा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. मंगळवारी दुपारी 12 च्या सुमराास वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी यांनी विच्छेदन केले. मृत भागवत नारखेडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन अपत्ये आहेत. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, मोहन पाटील करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !