भरधाव ओमनीच्या धडकेने रीक्षा उलटली : पळासखेड्यातील मजूर ठार, चौघे गंभीर
Rickshaw overturns after collision with speeding Omni : Laborer in Palaskheda killed, four seriously बोदवड : शेतमजुरांना घराकडे घेऊन जाणार्या अॅपेला भरधाव ओमनी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दादाराव किसन सुरवाडे (35, रा. पळासखेडा, ता.बोदवड) या शेतमजुराचा मृत्यू झाला तर अन्य 12 जखमी झाले, त्यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान बोदवडनजीक घडला. अपघातप्रकरणी जीवन कडू सुरवाडे (पळासखेा) यांच्या फिर्यादीवरून ओमन चालक (एम.पी.47) पूर्ण नंबर माहित नाही विरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ओव्हरटेकच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने धडक
बोदवड तालुक्यातील पळासखेडा येथील शेतमजूर शेलवड शिवारातील निंदणीचे काम आटोपून घराकडे निघाल्यनंतर मंगहवारी दुपारी तीन वाजता ाकी फाट्याजवळ ओमनी वाहनाने अन्य ओमनीला ओव्हरटेक करीत अॅपे (एम.एच.19 ए.एक्स.8174) ला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर अॅपे रीक्षा दोन वेळा उलटली व दादाराव किसन सुरवाडे हा जागीच ठार झाला तर वाहनातील 12 जण जखमी झाले.






विशेष म्हणजे अपघातात मयत दादाराव यांची पत्नी अनिता सुरवाडे (40), वडिल किसन सुरवाडे (68), आई यशोदा किसन सुरवाडे (64) हेदेखील जखमी झाले तर प्रदीप गोवर्धन राठोड (30), सुनीता समाधान सुरवाडे (40), शेषराव तेजराव सुरवाडे (32), लता सुनील निकम (40), वैशाली विनोद सुरवाडे (36), सपना गणेश सुरवाडे (20), अन्नपूर्णा एकनपाथ सुरवाडे (40), कल्पना शेषराव सुरवाडे (28), शोभा रवींद्र सुरवाडे (30) व रवींद्र मधुकर सुरवाडे (35) हे जखमी झाल्याची माहिती आहे. मयत दादाराव यांच्या दोन लहान मुले व आई, वडील, पत्नी असा परीवार आहे.


