वाळू माफिया मुजोर : कुर्‍हेपानाचे महिला मंडळाधिकार्‍यास धक्काबुक्की


Sand Mafia Mujor : Kurhepana’s women councilor gets a shock भुसावळ : विना परवाना वाळूची वाहतूक करताना महसूल प्रशासन ट्रॅक्टर चालकाविरूद्द कायदेशीर कारवाई करीत असतांना ट्रॅक्टर मालकाने तेथे येत महिला मंडळाधिकारी यांना धक्काबुक्की करून खाली पाडल्याने शासकीय कामात अडचण निर्माण केल्याचा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवार, 23 रोजी दुपारी 12.30 वाजता वराडसीम ते बेलव्हाय रस्त्यावर घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

वाळू माफिया शिरजोर
वराडसीम ते बेलव्हाय रस्त्यावर पाटाच्या पुढे असलेल्या शेत गट नंबर 877 जवळ रोडवर बुधवार, 23 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करीत असतांना मंडळाधिकारी योगिता पाटील यांना ट्रॅक्टर चालक अविनाश चंद्रकांत पवार हा अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना आढळल्याने त्याच्याविरूध्द कारवाई केली जात असतांना ट्रॅक्टर मालक किरण शेषराव शिंदे (रा. बेलव्हाय, ता.भुसावळ) मोटरसायकलने येऊन मंडळाधिकारी पाटील यांच्याशी हुज्जत घातली तसेच महिला मंडळाधिकारी पाटील यांना ढकलून खाली पाडले. सरकारी कामात अडथळा आणत कारवाईसाठी उभे केलेले ट्रॅक्टर तेथून घेऊन पळ काढल. याप्रकरणी मंडळाधिकारी योगिता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश पवार व किरण शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास परीवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !