मुक्ताईनगर पोलिसांनी अवैध गुरांची वाहतूक रोखली : दोघांविरोधात गुन्हा
Muktainagar Police stopped illegal cattle traffic : Crime against two मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कोर्हाळा-कुर्हा मार्गावर छोटा हत्ती या वाहनातून अवैधरीत्या गुरांची वाहतूक होत असताना बजरंग दल कार्यकर्त्यांनी पोलिसांना सूचित केल्यानंतर गुरांची सुटका करण्यात आली तर वाहनासह सव्वा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
पाठलाग करून कारवाई
मुक्ताईनगर तालुक्यातील कोर्हाळा येथे छोटाहत्ती (एम.एच. 19 सी.एक्स.0042 ) या वाहनातून दोन गाय व एक वासरूची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती कुर्हा-काकोडा येथील दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे हरीष गवळी, गोपीचंद सोनवणे, राहुल नावकर व सागर सावे यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पिकअप वाहनाचा पाठलाग करून त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गाय व एक वासरू आढळले. पोलिसांनी वाहनासहीत चार लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर गुरांच गो शाळेत रवानगी केली. गोपाळ समाधान पवार (21), मयुर रमेश डोबे (20, वढोदा, ता.मुक्ताईनगर) यांच्याविरोधात कॉन्स्टेबल सागर सावे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला व संशयितांना अटक करण्यात आली.








