भुसावळात इनरव्हील रेलसिटीतर्फे मोफत कापडी पिशव्यांचे वाटप
Distribution of free cloth bags by Innerwheel Railcity at Bhusawal भुसावळ : पर्यावरण संवर्धनासाठी ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे मोफत कापडी पिशव्यांचे वाटप म्युनिसिपल हायस्कूलजवळ करण्यात आले. क्लब सदस्यांनी आपल्या घरातील जुन्या साड्यांचा पिशव्या बनवण्यासाठी वापर केला.
दिड हजार पिशव्यांचे वाटप
जवळपास दिड हजार पिशव्या शिवून त्यांचे वाटप रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोनदरम्यान नागरीकांना करण्यात आले. क्लबने प्लास्टिक पिशव्या, कॅरीबॅग टाळा आणि पर्यावरण वाचवा हा संदेश दिला. असे उपक्रम नेहमी व्हायला हवे यासाठी विविध संस्थांनी पुढे यायला पाहिजे, असे मत प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी व्यक्त केले. पुढील वर्षी हा उपक्रम आमचा क्लब आणखी जोमाने करेल, अशा निर्धार प्रोजेक्ट चेअरमन सुनीता पाचपांडे यांनी बोलून दाखवला. या प्रोजेक्टसाठी अध्यक्षा रेवती मांडे, सचिव सीमा सोनार, प्रोजेक्ट चेअरमन सुनीता पाचपांडे व सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.

