भुसावळात सार्वजनिक जागी गांजा सेवन : एकाविरोधात गुन्हा
Consuming ganja in public place in Bhusawal : Offense against one भुसावळ : सार्वजनिक जागी गांजा सेवन करीत धुम्रपान केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी एकाविरोधात कारवाई करीत गुन्हा दाखल केला.
गांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर
शेख रमजान शेख रऊफ (38, जाम मोहल्ला, भुसावळ) हा संशयित जामनेर रोडवरील एस.बी.आय.बँकेपुढे अंधारात धुम्रपान करीत असताना रविवारी रात्री पावणे वाजता आढळल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी त्यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार रमण सुरळकर करीत आहेत.








