शरीरसंबंध ठेवू न देणार्या महिलेवर प्राणघातक हल्ला ; वादात मध्यस्थी करणारे दोघे जखमी
Assault on a woman who refused to have intercourse ; Two mediators were injured सावदा : 40 वर्षीय महिला दोन वर्षांपासून ओळख असतानाही बोलत नाही तसेच शरीरसंबंध ठेवण्यास नकार देत असल्याने 36 वर्षीय तरुणाने महिलेवर प्राणघातक हल्ला केला तसेच या वादाची मध्यस्थी करताना दोघे जखमी झाले. ही घटना चिनावल शिवारातील एका शेताच्या बांधावर 31 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता घडली. या प्रकरणी संशयित सिद्धार्थ बळीराम भालेराव (36, चिनावल, ता.रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे हल्ला प्रकरण
रावेर तालुक्यातील एका गावात 40 वर्षीय महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. संशयित सिध्दार्थ बळीराम भालेराव (36) याची महिलेशी ओळख होती मात्र दोन वर्षांपासून पीडीत महिलेने सिध्दार्थ सोबत बोलणे बंद केल्याचा राग मनात ठेवून गुरुवार, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शेतात काम करत असताना संशयित आरोपी सिध्दार्थ भालेराव हा तिच्याजवळ आला. तु माझ्याशी का बोलत नाही, माझ्याशी शरीरसंबंध का ठेवत नाही असे बोलून त्याने महिलेसोबत वाद घालत तिचा विनयभंग केला धारदार वस्तूने वार केल्याने फिर्यादीच्या डाव्या हातावर जखम झाली तसेच दुसरा वार डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ लागल्याने महिला जखमी झाली. हा वाद सुरू असताना दोघांनी मध्यस्थी केली मात्र त्यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले. याप्रकारानंतर संशयित आरोपी सिध्दार्थ भालेराव याच्या विरोधात महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.








