बोदवड शहरात भरधाव ट्रकने चिरडल्याने वयोवृद्धाचा मृत्यू


An elderly man died after being crushed by a speeding truck in Bodwad city
बोदवड :
भरधाव ट्रकने पायी जाणार्‍या 78 वर्षीय वृध्दाला चिरडल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरील अमर हॉटेल समोर घडली. गंगाराम पाटील (78, बोदवड) असे मृत वृध्दाचे नाव आहे. दरम्यान, मुख्य रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे या वृध्दाचा जीव गेल्याचा नागरीकांचा आरोप असून चौकातील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

पायी जात असताना ट्रकने चिरडले
बोदवड येथील प्रभू अ‍ॅग्रोमध्ये काम करीत असलेले सुरेश गंगाराम पाटील यांचे वडील गंगाराम पाटील (78) हे शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पायी जात असताना शहरातील अमर हॉटेलजवळ नाडगाव कडून मलकापूरला जात असलेल्या ट्रकने गंगाराम पाटील यांना धक्का दिला व ते रोडवर पडले. तेवढ्यात ट्रकने त्यांना चिरडले व जागीच ठार झाले. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक व पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी बोदवड पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.







अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी
अमर हॉटेलच्या परीसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असून या अतिक्रमणामुळे वृद्धाचा बळी गेल्याचा आोप आहे. या अतिक्रमणाबाबत अनेकदा नागरीकांनी तक्रार केल्या मात्र दखल घेतली जात नसल्याने वाहनधारकांसह अतिक्रमण करणार्‍यांचे फावले आहे. बोदवड नगरपंचायत च्या हलगर्जीपणामुळे व पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आज परत एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आहे त्यामुळे या गोष्टीकडे संबंधित अधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे शिवाय वाहतूक नियंत्रणासाठी चौकात वाहतूक पोलिसाची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !