भुसावळातील विवाहितेला पोस्टाने पाठवला ट्रिपल तलाख : पुण्यातील पतीविरोधात गुन्हा


Triple talaq sent by post to married woman in Bhusawal : Crime against husband in Pune भुसावळ : भुसावळ शहरातील खडका रोड परीसरात माहेर आलेल्या विवाहितेला कौटुंबिक वादातून पतीने पोस्टाद्वारे ट्रिपल तलाखाची नोटीस पाठवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पुण्यातील पतीविरोधात गुरूवार, 31 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाहितेने नोंदवली तक्रार
भुसावळ शहरातील खडका रोड परीसरात माहेर असलेल्या 29 वर्षीय विवाहितेचा विवाह पुण्यातील हडपसर येथील अर्षद हारून अत्तार (33, प्रतिभा रेसीडेन्सी, ससाणे नगर, हडपसर, पुणे) यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून पती व पत्नी यांच्यात कौटुंबिक वाद सुरू असून पती अर्षद हारून अत्तार यांनी 22 जून ते 23 ऑगस्ट 2023 पत्नी रूफिना नाज अरशद आत्तार यांना तीन वेळा तलाक नावाची नोटीस पोस्टाने पाठविली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिल्याने पती अर्षद हारून अत्तार याच्या विरोधात गुरूवारी रात्री 8 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद बळवंत कंक करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !