मुक्ताईनगर पोलिसांनी रोखली प्राण्यांची निर्दयतेने वाहतूक : चौघा गोर्ह्यांची सुटका
Muktainagar police stopped the cruel transport of animals : four donkeys were rescued मुक्ताईनगर : मुक्ताईनगर पोलिसांनी प्राण्याची निर्दयतेने होणारी वाहतूक रोखत चार गोर्ह्यांची सुटका केली असून रसलपूरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नायगाव फाट्यावर पांढर्या रंगाच्या छोट्या हत्ती वाहनातून (एम.एच.19 ई.एल.0460) गुरांची निर्दयतेने वाहतूक होत असताना पोलिसांनी 70 हजार रुपये किंमतीच्या चार गोर्ह्यांची सुटका करीत चार लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी रवींद्र लिलाधर चौधरी यांच्या फिर्यादीवरून शेख अनिस शेख अलमोद्दीन (रसलपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक गजमल पाटील करीत आहेत.








