बामणोद महिला मंडळाधिकार्यांवर हल्ला प्रकरणी चौघा चार संशयीतांना अटक : ट्रॅक्टर ट्रॉली जप्त
Four suspects arrested in case of attack on Bamanod women board officer: Tractor trolley seized यावल : यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळील महिला मंडळाधिकारी यांच्यावर वाळू माफीयांनी हल्ला केला होता. याप्रकरणी यावल पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून गुन्ह्यातील पळवून नेण्यात आलेले ट्रॅक्टर व टॉली पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, अटकेतील संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता चौघांना 4 सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे हल्ला प्रकरण
गुरुवारी अवैध वाळू वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरला बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी यांनी रोखले होते. त्यांच्याशी धक्काबुक्की करीत सदर ट्रॅक्टर पळवण्यात आले होते व या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शिरसाड, ता.यावल या गावाकडून गुरूवारी थोरगव्हाण येथे बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी बबीता चौधरी या जात असताना शिरसाड गावाजवळील रस्त्यात त्यांना निळ्या रंगाचे ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करतांना दिसल्याने त्या ट्रॅक्टरच्या सिटवर बसल्या असतांना त्यांना तेथून ओढून खाली खेचत ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले व याप्रकरणी यावल पोलिसात शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे यांनी ट्रॅक्टर व ट्राली जप्त केली असून निलेश समाधान सोनवणे, अजय दिलीप भालेराव (दोघे राहणार थोरगव्हाण), मयूर उर्फ अमोल प्रकाश कोळी (शिरसाड) व गोविंदा वना माळी (रा.साकळी) या चार जणांना अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व श्यामकांत धनकर करीत आहे.








