परसाडे गावातील 21 वर्षीय विवाहित तरुणीची आत्महत्या


Suicide of a 21-year-old married girl from Parsade village यावल : यावल तालुक्यातील परसाडे गावातील 21 वर्षीय विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेतला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजना आमीन तडवी (21, रा.परसाडे, ता. यावल) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
संजना या विवाहित तरुणीने रविवार, 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घरात एकटी असतांना आपल्या राहत्या घरात एकटी असताना छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी विवाहितेच्या मृतदेहाचे शिवविच्छेदन केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !