भुसावळात लाठीहल्ल्याच्या निषेध : मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण

आमदार संजय सावकारेंसह आमदार चंद्रकांत पाटील यांचा पाठिंबा


Protest against baton attack in Bhusawal : Symbolic hunger strike of Maratha community भुसावळ : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला करीत रबराच्या गोळ्या चालवल्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. भुसावळ शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासह दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी सकल मराठा समाजाने जुन्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन केले. अमानुष लाठीहल्ल्याचा निषेध करुन समाजबांधवांनी प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे, मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला भेट देवून पाठिंबा दर्शवला.

खोटे गुन्हे मागे घेण्यची मागणी
महाराष्ट्रातील मराठा समाज आर्थिक व दुर्बल घटकांना त्वरीत आरक्षण द्यावे तसेच जालना येथे निरपराध समाज बांधवांवर दाखल झालेले खोटे गु्न्हे रद्द करावेत, गृहमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी स्विीकारुन जाहिर माफी मागावी. त्यासोबतच सर्व मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी सकल मराठा समाज बांधवांनी दिला. या लाक्षणिक आंदोलनानंतर आंदोलक समाज बांधवांनी प्रांताधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन दिल.े यावेळी मराठा समाजाचे अध्यक्ष रवी ढगे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे आदींसह सर्व समाजबांधव उपस्थित होते.

विविध पक्ष, संघटनांचा पाठींबा
मराठा समाजाच्या लाक्षणिक उपोषणाला लोणारी समाजातर्फे युवराज लोणारी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख दीपक धांडे, आरपीआय आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, पीआरपीचे जगन सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे विनोद सोनवणे, बामसेफ संघटना, मुस्लिम समाजाचे रहेमान शेख, भुसावळ तालुका काँग्रेस पार्टी आदींसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !