पुस्तक ज्ञान नाही, जीवन जगणंही शिकवता तुम्ही !

शिक्षक दिन : भुसावळ विभागात विद्यार्थ्यांनी चालवली शाळा : शिक्षक गुरूंचा केला सन्मान


भुसावळ : भुसावळ शहर व परीसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये मंगळवारी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षक असलेल्या गुरुंना वंदन करीत त्यांचा सन्मान केला तसेच दिवस शिक्षक, मुख्याध्यापक बनून दिवसभर अध्यापनाचे कार्यही केले. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

नाहाटा महाविद्यालय, भुसावळ

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान, आणि पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात स्टॉप अकॅडमी आणि स्टॉप अ‍ॅण्ड स्टूडंट वेल्फेअर कमिटी अंतर्गत शिक्षक दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षथसानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक होते. संस्थेचे चेअरमन महेश फालक, खजिनदार संजय नाहाटा, प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच. बर्‍हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.ई.जी नेहेते यांनी केले. स्टॉप वेलफेअर अ‍ॅकेडमीचे चेअरमन डॉ.पी.ए.अहिरे व डॉ.मोहन फालक यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.संगीता भिरुड यांनी तर आभार प्रा.स्मिता बेंडाळे यांनी आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ :
श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिवस म्हणून साजरा झाला. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व सरस्वती वंदना सादर केली. अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी प्रतिमा पूजनानंतर सांगितले की, शिक्ष हा आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांचे जीवन एका विशिष्ट ध्येयासाठी समर्पित असावे. ध्येयासक्त विद्यार्थीच जीवनात खूप यशस्वी होतो. सुधीर शर्मा यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन मेहविष शेख व विकास पंडित यांनी केले व आभार कशिष इदा याने मानले. कार्यक्रमात डॉ.प्रवीण जाधव, हितेश गुप्ता, डॉ.सुधीर शर्मा, डॉ.पूनम त्रिवेदी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.समता तायडे, प्रा.शीबा खान उपस्थित होत्या.

म्युन्सीपल हायस्कूल, भुसावळ
भुसावळ : नगरपरीषद भुसावळ संचलित म्युन्सीपल हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ललित फिरके होते. प्रमुख पाहुणे पालक शिक्षक संघाचे अब्दुल हमीद शेख बाबू, भारती मतलाने, ज्येष्ठ शिक्षिका मालती भिरूड होते. प्रसंगी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षिका मालती भिरूड (पाटील) यांचे पती प.क.कोटेच्या विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे.एच.पाटील. यांच्यातर्फे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना नॅपकिन, श्रीफळ व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. स्वाती सोनवणे हिने मनोगत व्यक्त केले. केशर सिंग, लकी सोनवणे, स्वाती सोनवणे, डिंपल अडागळे, सनी सोनवणे विद्यार्थ्यानी शिक्षकाची भूमिका वठवली. सूत्रसंचालन नाना पाटील यांनी केले.

इनरव्हील रेलसिटी, भुसावळ
भुसावळ :
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे शहरातील जिजामाता प्राथमिक विद्या मंदिरात जाऊन तेथील सर्वं शिक्षकांचा गुलाबपुष्प आणि पेन भेट देऊन सत्कार करण्यात आला. आजची पिढी घडवण्याचे महत्वाचे कार्य करीत असलेल्या शिक्षकांबद्दल संपूर्ण समाजातर्फे आम्ही आपले ऋण व्यक्त करीत असल्याची भावना अध्यक्ष रेवती मांडे यांनी व्यक्त केली.

भोळे महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला. भुसावळ बँक ऑफ महाराष्ट्रचे सिनियर मॅनेजर गुलशन कुमार गौरव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. शिक्षणाशिवाय कोणताही व्यक्ती आपले ध्येय गाठू शकत नाही. व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचे खूप असे अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान असल्याचे प्राचार्य भोळे म्हणाले. प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.बी.ढाके तर आभार प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी मानले. डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.आर.डी.भोळे प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा निर्मला वानखेडे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रकाश सावळे उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी कळवितात.

अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ
भुसावळ ः अहिल्यादेवी कन्या विद्यालयात शिक्षक दिनानिमिश्रत्त संस्थेचे अध्यक्ष महेंद्र (सोनू) मांडे यांनी विद्यार्थिनींनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तूंचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिनी मुख्याध्यापिका पियुशा महाजन व विद्यार्थिनी पर्यवेक्षिका ऋचा भारंबे उपस्थित होत्या. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे संपूर्ण कामकाज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांभाळले. शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

धनाजी नाना विद्यालया, खिरोदा
खिरोदा :
धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापिका मनिषा महाजन, पर्यवेक्षक एस.पी.चौधरी यांची उपस्थिती होती.शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींचा सत्कार जनता शिक्षण मंडळ खिरोदा या संस्था परीवाराच्या वतीने मुख्याध्यापिका मनिषा महाजन व पर्यवेक्षक एस.पी.चौधरी यांच्याहस्ते करण्यात आला. बालक पालक फाउंडेशन, पुणे विद्यालयाच्या उपशिक्षिभका ारती बढे यांचा क्रियाशिल शिक्षिका म्हणून गौरव झाल्याबद्दल त्यांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी केला. मुख्याध्यापक विभूती नेमाडे , पर्यवेक्षिका भाग्यश्री ठाकूर व सर्व विदयार्थी शिक्षकांनी नियोजनाप्रमाणे शाळा चालविली. कार्यक्रमाचे नियोजन एम.जी.पाटील व डी.एस.वाघ यांनी केले.

नाहाटा महाविद्यालयात भित्तीपत्रिका स्पर्धेचे आयोजन –
भुसावळ  : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागातर्फे शिक्षक दिनानिमित्त भित्तिपत्रिका स्पर्धा घेण्यात आली. उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्याहस्ते झाले. संस्थेचे चेअरमन महेश फालक, कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते. भित्तीपत्रिका स्पर्धेसाठी गुरु शिष्य परंपरा, चांद्रयान 3 मोहीम , आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आदी विषय विद्यार्थ्यांनी मांडली. परीक्षण प्रा.डॉ.गौरी पाटील, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक फहीम पटेल यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाविषयी माहिती प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी दिली. कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा.डॉ.के.के.अहिरे, डॉ.स्वाती महाजन, डॉ.दिनानाथ पाठक, प्रा.वंदना महाजन, प्रा.गौतम भालेराव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

माध्यमिक विद्यालय, बोदवड
बोदवड : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयज्ञी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर .टी.बडगुजर तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.जी.हजारी, एस.पी.मंगळकर होते. तर विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून श्रेया खंडेराव ही होती. सूत्रसंचालन जंगले सर व कुमोदिनी वानखेडे यांनी केले. अश्विनी साळुंखे हिने वक्ता म्हणून शिक्षक दिनाविषयी माहिती सांगितली. सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. आभार वराडे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !