प्राजक्ता असोदेकर-बोरोले यांचा आदर्श शिक्षिका 2023 पुरस्काराने गौरव
सावदा : जळगावातील लेवा भवनात सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, शिवसेना जळगाव जिल्हा, रोटरी क्लब सेंट्रल जळगाव व युवा विकास फौंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शिक्षकांचा लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
त्या समारंभात प्राजक्ता-असोदेकर-बोरोले यांना लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या गि.न.चांदसरकर माध्यमिक विद्यालय, जळगाव या शाळेत उपशिक्षिका आहेत. आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मधुस्नेह संस्था परीवाराचे कुटुंबप्रमुख आमदार शिरीष चौधरी, युवानेते धनंजय चौधरी व संस्था परीवाराने हार्दिक अभिनंदन केले. त्या खिरोदा येथील ग.स.चे माजी अध्यक्ष व जनता शिक्षण मंडळाचे विदयमान संचालक तुकाराम बोरोले व प्राचार्या डॉ.प्रतिभा बोरोले यांच्या स्नुषा तर मुकेश बोरोले यांच्या पत्नी आहेत.








