अहिरवाडीतील केळी कामगाराला भरधाव ट्रकने चिरडले
Banana Kamaga from Ahirwadi was crushed by a speeding truck रावेर : केळी वाहतुकीचे काम करून कुटूंबाला हादभार लावणार्या अहिरवाडीतील 25 वर्षीय युवकाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक मंगळवारी सकाळी 10 वाजता घडली. मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय 25, रा. अहिरवाडी ता.रावेर) असे मयत युवकाचे नाव आहे.
हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह !
रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथे मनोहर उर्फ मनोज वाघ हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता व हातमजूरी कुटुंबाला मदत करीत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास तो दुचाकीने नेरुळ येथे कामावर जात असतांना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर दुचाकीवरुन रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघाताची माहिती मिळताच मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला लागलीच रुग्णालात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता.






गर्भवती पत्नीसह कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !
मनोहरच्या कुटुंबाची आर्थिक रिीस्थिती हालाखीची असून तो हातमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढत होता. अपघातात मनोहर उर्फ मनोजरचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. मनोहरच्या पश्चात आई, वडील, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्याची पत्नी गरोदर असल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


