आजी-माजी मुख्यमंत्र्यांची 10 रोजी जळगाव जिल्ह्यात सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पाचोर्‍यात तर उद्धव ठाकरे यांची 10 रोजी जळगावात सभा


Meeting of former Chief Ministers in Jalgaon district on 10th जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांची जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी जाहीर सभा होत असल्याचा योग जुळून आला आहे. शिंदे आणि ठाकरे हे दि.10 रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत असल्यामुळे दोघांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 रोजी पाचोर्‍यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणार होते, मात्र त्यांच्या दौर्‍यात बदल झाला असून त्यांचा दौरा रविवार, 10 सप्टेंबर रोजी होत आहे तर याचदिवशी पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते होईल. एकाच दिवशी पाचोरा व जळगाव येथे दोघा दिग्गज नेत्यांची तोफ धडाडणार आहे.

जळगावऐवजी पालकमंत्री पाचोर्‍यात जाणार
महापालिकेच्या आवारात सरदार वल्लभभाई पुतळा साकारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण उध्दव ठाकरे यांच्याहस्ते होणार आहे. महापालिकेचा शासकीय कार्यक्रम असल्याने महापौर जयश्री महाजन व आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना आमंत्रीत केले होते मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी रविवार, 10 रोजी पाचोर्‍यात येत असल्याने तिघं मंत्री पाचोर्‍याच्या कार्यक्रमाला जाणार आहेत. सरदार वल्लभाईंच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्यांची अनुपस्थिती राहिल, हे स्पष्ट झाले आहे.

राजकीय भाषणबाजीकडे लागले लक्ष
शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या सहकार्याने मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली तर उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धत्तीविषयी ते सातत्याने टिका करीत आहेत आहेत तर जिल्ह्यात दोघे दिग्गज नेते येत असल्याने ते नेमके काय टिकेचे बाण चालवतात? याकडे राजकीय समीकक्षांचे लक्ष लागले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !