भुसावळातील बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करा, लोंबकळलेल्या वीज तारांची उंची वाढवा

भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या सूचना : मिरवूणक मार्गाची पाहणी


Start closed CCTV in Bhusawal, raise the height of hanging power cables भुसावळ : भुसावळातील श्री विसर्जन मार्गावरील लोंबवळणार्‍या वीज तारा तातडीने उंच कराव्यात तसेच श्री विसजर्नन मार्गावरील बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने पालिका प्रशासनाने सुरू करावे तसेच संपूर्ण मिरवणूक मार्गावर फोकस लावावेत, महसूल विभागातर्फे दंडाधिकारी नियुक्त करावा, अशा सूचना पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पालिका कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये दिल्या. यावेळी मुख्याधिकारी महेश वाघमोडे व पालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूभूमीवर पालिका कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पोलीस उपअधीक्षक पिंगळे यांनी शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही सुरू करण्यासह गणेशोत्सवाच्या काळात ज्या भागात वीज नाही, त्या भागात फोकस लावावे, मिरवणुकीच्या मार्गावर फोकस लावावे, जे रस्ते वाहतुकीला बंद करण्याची गरज आहे, ते रस्ते बंद करावे, बॅरेकेट लावण्यात यावे, विसर्जनाच्या दिवशी बसस्थानकांचे स्थलांतर करावे, लोंबकळणारे वीजेचे तार वर उचलण्यात यावे आदी सूचना डीवायएसपी पिंगळे यांनी दिल्यात.

अधिकार्‍यांकडून विजर्सन मार्गाची पाहणी
यावेळी विसर्जन मिरवणूक मार्गाची अधिकार्‍यांनी पाहणी केली. यावेळी कुठे फोकस लावायचे, कुठे कॅमेरे लावायचे, कुठे बॅरेकेट लावून रस्ता बंद करावा, याचे नियोजन करण्यात आले. तापी नदीच्यापात्रात कुठे फोकस लावायचे, कुठे पोहणारे पथक राहील, या किनार्‍यावर किती, पलिकडच्या तिरावर किती जण ठेवायचे याचे नियोजन करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. पोलिसांकडून विसर्जन मिरवणूक मार्गाची पहाणी करण्यात आली, यावेळी पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे,. निरीक्षक बबन आव्हाड, निरीक्षक गजानन पडघण, पालिकेचे शेख परवेज यांच्यासह गोपनिय विभागातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !