धक्कादायक ! : अंजाळे-भुसावळदरत्यान एस.टी.कंडक्टरला आला हृदयविकाराचा तीव्र झटका अन् घडलं विपरीत…!


Shocking! : Anjale-Bhusawal Dartyan ST Conductor had a severe heart attack and the opposite happened…! यावल : यावल आगारातील कार्यरत वाहक दिलीप वासुदेव नाले (57, देशमुखवाडा, यावल) यांचे कर्तव्यावर असतांना अंजाळे-भुसावळ दरम्यान एसटी बसमध्ये ह्वदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अकाली मृत्यू
गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास यावल-भुसावळ एस.टी.बसने सेवा बजावत असताना अंजाळे गावाजवळ दिलीप नाले यांना हृदयाचा त्राण जणवला तर चक्कर येवुन ते बेशुद्ध झाल्याने त्यांना ात्काळ भुसावळच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याबातची माहिती कळताच यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तत्काळ आपल्या सहकार्‍यांसह भुसावळात धाव घेतली.







दितीप नाले हे मागील 26 वर्षापासून यावलच्या एसटी आगारात वाहक या पदावर कार्यरत होते. आपल्या हसतमुख स्वभावाने ते सर्वाचे परीचीत होते. नाले यांच्या सेवानिवृत्तीला अवघ्या दोनच महिन्यांचा कालावधी राहिला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !