मांडवेदिगरात अंगणवाडी सेविकेच्या कामात अडथळा : दोघांविरोधात गुन्हा
Obstruction of work of anganwadi worker in Mandvedigarat: Crime against two भुसावळ : अंगणवाडी सेविकेच्या कामात व्यत्यय आणून तिच्याशी अरेरावी करीत तिला ढकलून देण्यात आल्याची घटना भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथे बुधवार, 7 रोजी सकाळी 9.30 वाजता घडली. याप्रकरणी दोघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
मांडवेदिगर येथे बुधवार, 6रोजी सकाळी 9.30 ते 10.30 या वेळात पितांबर दरबार पवार यांनी अंगणवाडी सेविका सुरेखा बाळू बाविस्कर या शैक्षणिक काम करीत असतांना अंगणवाडी उघडण्यास उशीर का केला ? म्हणून वाद घालत शासकीय कामात अडथळा आणला. यावेळी बाविस्कर या विद्यार्थ्यांना शिकवीत असतांना सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास गणेश पुनमचंद पवार यांनी अंगणवाडीत येत हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणला व दमदाटी केली. यावेळी बाविस्कर यांना ढकलून दिल्याने अंगणवाडी सेविका या गटारीत पडल्यात यामुळे त्यांना लागले. यामुळे सुरेखा बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री आठ वाजता पितांबर दरबार पवार व गणेश पूनमचंद पवार (रा.मांडवेदिेगर, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास परीवेक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहे.








