भुसावळ परीसरातील कर्तृत्ववान शिक्षकांचा आज सन्मान
भुसावळ शहरातील डॉ.छाया रुपेश देशमुख पालक व माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार, 10 रोजी परीसरातील सर्व शिक्षक वृंदांचा गौरव करण्यात येणार आहे. स्थानिक पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या वाचन कक्षात संध्याकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे असतील. उद्घाटक म्हणून शिक्षक मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून उदय पाटील, मोहन फालक, एल.जी.इंगळे, युवराज लोणारी, राजेंद्र चौधरी, योगेश इंगळे, शैलेश पाटील, ज्ञानेश्वर बोबडे, रागिणी चव्हाण, मनोज बियाणी, अॅड. तुषार पाटील, राजेंद्र आवटे, डॉ.जयंत लेकुरवो, डॉ.जगदीश पाटील, जी.पी.सपकाळे व संजयसिंग चव्हाण असतील. शिक्षणप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन रुपेश देशमुख यांनी केले आहे.








