भुसावळ शहरात गोगानवमी उत्साहात : सजीव देखाव्यांनी फेडले डोळ्यांचे पारणे


Bhusawal Goganavami in excitement : A blink of an eye filled with vibrant scenes भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगर भागात शुक्रवारी गोगानवमी उत्सवानिमित्त परीसर दिव्यांनी उजळला होता. यंदाच्या उत्सवात ओरीसा, हरीयाणा, उज्जैन येथून विविध देखाव्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. रात्री उत्सवानिमित्त शहरात एकूण 14 मिरवणुका काढण्यात आल्या. मिरवणुकीतील देखाव्यांनी आणि वहनांनी भुसावळकरांचे लक्ष वेधले. संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास मिरवणूकांना वाल्मीक नगरातून सुरूवात झाली.

बसस्थानकाचे तात्पुरता स्थलांतर
गोगा नवमीनिमित्त शुक्रवारी शहरात 14 मिरवणुका निघाल्या तर जामनेर रोडवरील वाल्मीक नगरातून 12 मिरवणूका तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन अश्या 14 मिरवणुका निघाल्या. संध्याकाळी 6.30 वाजता मिरवणूकांना सुरूवात झाली. शहरातील नेहरू मैदानावर मिरवणूकीतील छडीचे स्वागत करण्यात आले. वाल्मीक नगरातून माजी नगरसेवक संतोष बारसे व गब्बर चावरीया यांच्या नेतृत्वाखाली निघाली. वाल्मीक नगरातून निघालेली ही मिरवणूक जामनेर रोडने पांडुरंग टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, बाजारपेठ पोलीस ठाणे येथे येऊन तेथूनच यु टन मारून पुन्हा जामनेर रोडने वाल्मीक नगराकडे गेली. गोगा नवमीनिमित्ता निघालेल्या मिरवणुकीमुळे येथील बसस्थानक हे पंधरा बंगला भागातील एसटी आगारात स्थलांतरीत करण्यात आल्याने प्रवाशांची काहीशी गैरसोय झाली. मिरवणुकीत सजीव देखाव्यांनी भुसावळकरांचे लक्ष वेधले होते. यात भोलनाथ महादेव, हनुमान, कालिका माता, महादेवाचे गण यांचे सजीव देखावे होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !