विद्यार्थ्यांसोबत भांडतो म्हणून विद्यार्थ्याला मारला लोखंडी रॉड : बोदवड उर्दू हायस्कूलच्या शिक्षकासह मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा


Student beaten with iron rod for fighting with students: Case filed against teacher and principal of Bodwad Urdu High School बोदवड : शाळेतील मुलांसोबत भांडण केल्यामुळे मुख्याध्यापकासह शिक्षकाने विद्यार्थ्याला लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप करीत पालकाने बोदवड पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना बोदवड शहरातील चंद्रकांत हरी बढे उर्दू शाळेत 29 ऑगस्ट रोजी घडली तर विद्यार्थ्याला शाळेतूनही काढून टाकण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

शैक्षणिक क्षेत्रात उडाली खळबळ
बोदवड शहरातील चंद्रकांत हरी बढे उर्दू हायस्कूलमध्ये शेख तनवीर शेख शरीफ मणियार (14) हा विद्यार्थी नववीत शिक्षण घेतो. मारहाणीच्या घटनेनंतर तन्वीर शाळेत गेला मात्र त्याला शाळेत जाण्यास उशीर झाल्याने मुख्याध्यापक कार्यालयात अत्तर उल्ला खान व मुख्याध्यापक नदीम खान यांनी पुन्हा लोखंडी पाईप व बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शाळा सोडल्याचा दाखला देऊन त्याला घरी पाठवले. तनवीरच्या वडिलांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारातून विद्यार्थी बरा झाल्यानंतर शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी शरीफ इब्राहिम मणियार यांनी फिर्याद दिल्यावरून शिक्षक अत्तर उल्ला खान शाहिद उल्ला खान (रा.मलकापूर) मुख्याध्यापक नदीम खान (रा.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीस शालेय प्रशासन जबाबदार असून शिक्षण विभागाने तातडीने याबाबत दखल घेऊन, कारवाई करावी, अशी मागणी संबंधित पालकांनी केली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !