कुर्‍हा पानाचे गावातून अडीच लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन लांबवले


A pick-up vehicle worth two and a half lakh rupees was recovered from the village of Kurha Panache
भुसावळ :
भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा पानाचे येथील गुरूकृपा पेट्रोलपंपाजवळ लावलेली पांढर्‍या रंगाची पिकअप 407 गाडी (एम.एच.19 बीएम 4848) ही चोरट्यांनी लांबवल्याने गावात खळळ उडाली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहन धारकांमध्ये चोरीमुळे खळबळ
कुर्‍हा पानाचे येथील गुरूकृपा पेट्रोल पंपाजवळ दोन लाख 50 हजार रुपयांची गाडी पार्क केल्यानंतर गुरुवार, 7 रोजी संध्याकाळी 6 वाजता ते शुक्रवारी चोरट्यांनी संधी साधली. सोपान गजमल महाजन (रा.कुर्‍हापानाचे) यांनी गाडीचा शोध घेतला, गाडी मिळाली नसल्याने त्यांनी तालुका पोलिस ठाणे गाठत दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनुस मुसा शेख पुढील तपास करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !