Kishori Pednekar मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकरांच्या अडचणी कायम : कोविड घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी


Former Mumbai mayor Kishore Pednekar’s problems continue: Economic crime branch probes thoroughly in Covid scam मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सोमवारी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दोन तास चौकशी केली. सकाळी 11 वाजता त्या पोलिस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाल्या. कोव्हीड काळात मुंबई महानगर पालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्समध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.

आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल आहे गुन्हा
कोविडमुळे मृत्यू झालेल्या लोकांना नेण्यासाठी महापालिकेने बॉडी बॅग्सची खरेदी केली होती मात्र त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणी किशोरी पेडणेकर व महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकार्‍यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अटकेची शक्यता वर्तविण्यात होती मात्र किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली होती.

4 सप्टेंबर रोजी न्यायालयाने त्यांना चार आठवड्यासाठी अटकेपासून संरक्षण दिले होते. तसेच, 11 सप्टेंबर, 13 सप्टेंबर व 16 सप्टेंबर रोजी त्यांना पोलिसांतर्फे होणार्‍या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दाखल झाल्या.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !