राष्ट्रवादीच्या पक्ष व चिन्हाबाबत आता 3 ऑक्टोंबरला सुनावणी
Hearing about party and symbol of NCP now on 3 October मुंबई : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा सांगितला होता. यानंतर शरद पवार गटाकडूनही पक्ष आणि चिन्हावर दावा केला गेल्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचले आहे. आता या प्रकरणी 3 रोजी सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादीतील फुटीचे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. पक्षातील खासदार शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला 3 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने बोलावलं आहे. यामुळे आता पक्षावर नेमका कोणता गट दावा सांगणार ? याकडे लक्ष लागले आहे.

निवडणूक आयोगात 3 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना सुनावणीसाठी 3 ऑक्टोबर रोजी बोलावले आहे. शिवसेनेचाही गेल्या काही महिन्यांपूर्वी असाच वाद निवडणूक आयोगात सुरू होता. आता तसाच वाद राष्ट्रवादी काँग्रेसचाही सुरू आहे.

