पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : गावठी पिस्टलासह गोराडखेड्याचा आरोपी जाळ्यात
Big operation of Pachora police : Accused of Goradkheda in the net with village pistol पाचोरा : पाचोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गोराडखेडा येथील संशयिताला गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूसासह अटक केली आहे. गौरव राजेंद्र पाटील (26, गोराडखेडा, ता.पाचोरा) असे अटकेतील आरोपीचेन नाव आहे. पाचोरा निरीक्षक राहुल खताळ यांना संशयिताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पिस्टल व पाच जिवंत काडतूसांसह आवळल्या मुसक्या
पाचोरा-जळगाव रस्त्यावरील गोराडखेडा गावापुढील बहुळा धरणाजवळ पोलिसांनी सोमवारी सापळा रचल्यानंतर सायंकाळी संशयित गौरव पाटील हा दुचाकी (एम.एच.29 डी.एच.1003) वरून आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या ताब्यातून पिस्टल व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले तसेच दुचाकी जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार विश्वास देशमुख, कॉन्स्टेबल प्रकाश शिवदे, योगेश सुरेश पाटील, कॉन्स्टेबल संदीप भोई आदींच्या पथकाने ही कारवाई केली. योगेश सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

