अजितदादा पवारांच्या गटात येणार का ? माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसेंना ऑफर !
Will Ajitdada join Pawar’s group ? Offer to former Minister MLA Eknathrao Khadse! जळगाव : भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार एकनाथराव खडसे यांना अजितदादांसोबत येणार का? म्हणून एका नेत्याने ऑफर दिली असल्याची माहिती खुद्द खडसे यांनी दिली आहे. मंत्री गिरीश महाजनांनी केलेल्या टिकेनंतर माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, आपण भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही. शरद पवार यांना सोडण्यासाठी अजितदादा गटाच्या दोन बड्या नेत्यांनीही आपल्याला फोन केले मात्र मी शरद पवारांचा पक्का शिलेदार असल्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही खडसे म्हणाले आहेत.
शरद पवारांची साथ सोडणार नाही
मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारलं होतं. तसेच शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात येण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचाही मला फोन आला होता, असा गौप्यस्फोट करतानाच मला या दोन्ही नेत्यांनी बोलावलं होतं. पण मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. कोणत्याही परिस्थिती शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

महाजनांचे नाव न घेता केली टिका
मी सत्तेसाठी कोणाचाही हाजीहाजी करणारा माणूस नाही. मी कोणाच्याही मागे उभा राहून फोटो काढणारा माणूस नाही. मीच संकट मोचक आहे असं सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो. स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असत तर कधीच गेलो असतो, असं म्हणत नाथाभाऊंनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली.
गेल्या काही दिवसापासून भाजप नेते गिरीष महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांना घट्ट पकडून रहावे भाजपकडे येण्यासाठी हातपाय जोडू नये, अशी टीका गिरीष महाजन यांनी खडसे यांच्यावर केली. या टीकेला आज आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

