आमदार अपात्रता प्रकरण : सुनावणी व पुराव्यांची गरज नाही ; कृती व निर्णय अपेक्षित ; अनिल देसाई
MLA disqualification Case : No Need for hearing and evidence ; expected actions and decisions; Anil Desai मुंबई : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्षांकडे सोमवारी सुनावणी झाली. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून लावून धरण्यात आली आहे परंतु विधानसभा अध्यक्षांनी पुढील तारीख दिली आहे. 13 ऑक्टोबरपर्यंत पुढील सुनावणी होणार असून दोन्ही गटांच्या वकील आपली बाजू मांडल्यानंतर याबाबतची सगळी माहिती 13 तारखेला एकत्र होईल. यानंतर सुनावणी एकत्र घ्यायची की वेगवेगळी तो निर्णय देणार आहेत.
कारवाईस हेतू पुरस्कार विलंब : अनिल देसाई यांचा आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर विधानसभा अध्यक्षा राहुल नार्वेकर यांनी सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी घेतली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी झाली. त्यात ठाकरे गटातर्फे देवदत्त कामत यांनी बाजू मांडली तर शिंदेंतर्फे अनिलसिंह साखरे यांनी युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाईस हेतुपुरस्सर विलंब करण्याचा आरोप केला.

शिवसेनेने 21 जून 2022 रोजी पहिली मिटिंग बोलावली होती. त्यावेळी समोरचे काही लोक (शिंदे गटाचे आमदार) आले नाही. ते अनुपस्थित राहिले. ही बाब त्यांनी नाकारली नाही. त्यांनी त्याचे कारण दिले असेल पण ते आले नव्हते हे स्पष्ट असल्याचे देसाई म्हणाले.

