भाजपामध्ये कोंडी होतेय का? ; पंकजा मुंडेनी दिले ‘हे’ उत्तर
पुणे : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना युनियन बँकेने सील केल्यानंतर मुंडे यांनी मी सोडून सर्वांना मदत मिळाल्याचे वक्तव्य केले होते. पुण्यात पंकजा मुंडे गणपती दर्शनासाठी आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना भाजपामध्ये आपली कोंडी होत आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दात मी कोंडी होण्याइतपत लहान नाही, असे उत्तर दिले.
जे आकडे आहेत ते व्याजाचे
पंकजा म्हणाल्या, ही घटना जीएसटी कर थकबाकीचे जे आकडे आहेत ते मुळातच व्याजाचे आहेत. उद्योग पूर्णपणे नुकसानीत आहे. आठ-दहा वर्षे सातत्याने दुष्काळ आल्यामुळे तो कारखाना लिक्विडेशनच्या परिस्थितीत आहे आणि बँकेकडे गहाण आहे त्यामुळे हे सर्व फॅक्ट्स आहेत. जे आकडे सांगितले जात आहेत, ते व्याजाचे आहेत. चुकीच्या पद्धतीने काहीच झालेलं नाही.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना आहे. ते ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी होते. त्यांनी खूप हालाखीत कारखाना उभा केला आणि मी खूप अडचणीत तो कारखाना सुरू ठेवला. तो कारखाना आता बँकेकडे आहे,’ असेही मुंडे म्हणाल्या. मी व्यवस्थित माझ्या संघर्षातून सुंदर मार्ग काढेन, असे त्यांनी सांगितले.

